Tuesday, July 25, 2006

FRIEND.....11/7 CHI AATHAVAN

परवा दादर स्टेशनवरएक मित्र दिसलामला तो खुप खचलेला वाटलाविचारपुस केल्यावरलखलखत्या दिव्यांसमोरहीअचानक अंधार पसरलातो म्हणाला, परवामहालक्ष्मी ला चाललो होतोबायकोला पोरासोबत लेडीज मध्ये चढ्वूनस्वतः जेन्ट्स मध्ये चढ्लोअचानक मोठा स्फोट झालाहसता खेळता माझा मुलगाकाळ्या धुराआड लपला,मी आणि बायको नेत्याचा शोध घेतलालाल चिखलातुन त्यालाअक्षरशः खेचुन काढ्लाजरा थकलेला दिसला म्हणूनबायकोच्या कुशीत विसावलासुजलेले डोळे किलकिले करुनमला व बायकोला म्हणाला-देवबापाने माझीआठवण काढली आहे,बाबा मी पुढे जातोपणतुमची आठवण खुप येणाररात्री झोपताना मलागोष्ट कोण सांगणार?शांतपणे डोळे मिटलेल्या माझ्या मुलाकडे बघुनस्टेशनचा खांबन खांब द्रवलाभूकंपाने धरणी काय हादरेल-असा स्टेशनचा वासान वासा कापलापोराने पदर घट्ट धरला म्हणूनतीही सोबत गेली...दोष नसताना द:खाचा डोंगरहाताने उकरतो आहेत्यांचा स्म्रुतीसागरातीलएकेक शिंपलाभरल्या डोळ्यांनी जपतो आहे...अचानक मित्र समोरच्या गर्दीतनाहीसा झालातोबा गर्दीतही तोपुर्णपणे एकाकी वाटला....

0 Comments:

Post a Comment

<< Home