Sunday, January 28, 2007

आयुष्य खूप सुंदर आहे............

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,

वेगळ अस काही,
माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका

मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे,
असं म्हणून रडू नका,

अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हान करा त्या सूर्याला!!!!!

मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून

मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........

आयुष्य खूप सुंदर आहे,सोबत कुणी नसल
तरी एकट्यानेच ते फुलवत रहा......

Saturday, January 27, 2007

आई.....................


थेंब थेंब झिरपणारा ओलावा पिंपळवृक्ष बनून उभा राहतो,
मी त्याला आई अशी हाक मारतो........
चला सलाम करू धन्य त्या मातेला,.........

------------------------------------------

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू,
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे,
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे.....

जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी.......

आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री,
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दु:खे खुशाल........

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी.....

आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबध्द टाळी,
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी........