Tuesday, September 19, 2006

दु:खाच्या घरी एकदाजमली होती पार्टी................

दु:खाच्या घरी एकदाजमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदीझींगली होती कार्टी...

दु :ख म्हणाले " दोस्तानों !बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणूनराग मानू नका!

मनात खूप साठल आहे काहीच सुचत नाही
माझी ' स्टोरी' सांगीतल्या शिवायआता राहवत नाही...

मी आणि सुख दोघेजुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हाजत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमलीनी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेतदिसतोय का 'सुख ' माझा कुणाच्या ही नजरेत...

"सुखा बरोबरचे लहानपणीचेक्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीनेदु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावेवाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आतामी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचाखूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचेआहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर
दु:खाच्या घरी मीच देईन पार्टी !

1 Comments:

Blogger hemant_surat said...

सुख म्हणाले सर्वांना,
खरंय दु:ख आणि मी जुळे भाऊ होतो.
पण गर्दीत हरवलो जत्रेच्या
हे मात्रं खोटे आहे.
अरे, नीट पहा
मी एक आरसा आहे
मीच सुख आहे पण
नीट नाही पाहीले तर
मीच दु:ख आहे
एका डोळ्याने पहा
मी सुख आहे
दुसर्याने पहा,
मीच दु:ख आहे
पटत नसेल विचार करा
समाधान माझे बाबा आहेत
आशा माझी आई आहे.
त्यांनाही चकविले एका आरशाने
समाधान पळून गेले असूयेबरोबर
आशा बसून राहिली आळशाबरोबर
मग जन्मं मिळणार दु:खालाच ना.
हेमंत_सूरत

3:54 AM  

Post a Comment

<< Home