Saturday, August 12, 2006

आई...........

दिवसभर कितीही दंगा केलातरी
मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच
कदाचितशांत झोप कधी लागली नाही
कुणी विचारतं .."तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना,
घरातून निघतानाआईला मारलेली मिठी सोडवत नाही
आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस
तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली
घरापासून दूर ...आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे
तू आपल्या पिलांसाठी सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली,
"आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस
आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूरजग खूप वेगळं आहे

0 Comments:

Post a Comment

<< Home