Sunday, September 24, 2006

Answer......Posted by one friend......Thanq

सुख म्हणाले सर्वांना,
खरंय दु:ख आणि मी जुळे भाऊ होतो.

पण गर्दीत हरवलो जत्रेच्या हे मात्रं खोटे आहे.
अरे, नीट पहा मी एक आरसा आहे

मीच सुख आहे
पण नीट नाही पाहीले तर

मीच दु:ख आहे
एका डोळ्याने पहा मी सुख आहे

दुसर्याने पहा,मीच दु:ख आहे
पटत नसेल विचार करा

समाधान माझे बाबा आहेत
आशा माझी आई आहे.

त्यांनाही चकविले एका आरशाने
समाधान पळून गेले असूयेबरोबर

आशा बसून राहिली आळशाबरोबर
मग जन्मं मिळणार
दु:खालाच ना.?????

0 Comments:

Post a Comment

<< Home